September 23, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

सध्याच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीत ‘विचार शून्यता’ ही मोठी समस्या – नितीन गडकरी.

सध्याच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीत ‘विचार शून्यता’ ही मोठी समस्या – नितीन गडकरी.

प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राजकीय जीवनामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला. तसेच साहित्य, संस्कृती चित्रपट,कला आणि समाजसेवा याविषयीचे त्यांचे विचार पक्के होते. त्यामुळेच सर्वच क्षेत्रात प्रा.मोरे यांनी लीलया मुशाफिरी केली. सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता विचार शून्यता ही मोठी समस्या असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप लिखित‘परामर्श एका शिल्पकाराचा’ या प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे झाला.यावेळी नितीन गडकरी बोलत होते. प्रकाशन समारंभास काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे गजानन एकबोटे, लेखक विजय जगताप आदी उपस्थित होते.

गडकरी यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असे सांगून पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते परंतु आता याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अत्याधुनिक सोयी सुविधा यांचा लाभ घेऊ शकतो त्यातून नव्या पिढीला ज्येष्ठ विचारवंत प्रतिभावंतांचे मार्गदर्शन मिळू शकते त्याचे दस्ताऐवजी करण होऊ शकते असे मत व्यक्त केले.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह,म्हणाले की, प्रा. मोरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले कार्य केले,व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे दुर्भाग्य की त्यांचा लवकर मृत्यू झाला यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली.

यावेळी हर्षवर्धन पाटील, डॉ. सदानंद मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले. लेखक विजय जगताप यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. स्वागत उल्हासदादा पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभार मंदार चिकणे यांनी केले.

Related posts

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वाहतूक पोलिसांसाठी ‘मेंटल वेलनेस प्रोग्राम’

pcnews24

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा,तर मोरया गोसावी देवस्थानासाठी निधी.

pcnews24

महापालिका राबविणार महिलांसाठी ‘ या ‘ योजना..31 ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत

pcnews24

शुक्रवारी पाणी पुरवठा खंडित-महानगरपालिकेचे आदेश.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ‘या’ सात गावांचा होणार समावेश..खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी.

pcnews24

Leave a Comment