‘शरद पवारांनी अजित पवारांना बोल्ड केले’: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काय करु शकतात हे समाजासमोर आणायचे होते. त्यामुळे त्यांची विकेट घेतली, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ‘मी टाकलेल्या गुगलीमुळे शरद पवारांना सत्य सांगावे लागले आहे. पण, त्यांनी अर्धसत्य सांगितले, उरलेले सत्य मी सांगेन. एवढे आहे त्यांच्या गुगलीमुळे त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच बोल्ड केले आहे,’ असे प्रत्युत्तर फडणवीसांनी पवारांना दिले.