‘धर्मनिष्ठ समाज निर्मिती ही सर्वोत्तम गुरुसेवा’
सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन-
चिंचवड : ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा 3 जुलै 2023 या दिवशी पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार असलेली सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता दिघी येथील राघव मंगल कार्यालय, तर सायंकाळी 5.30 वाजता तळेगाव दाभाडे येथील अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय आणि सायंकाळी 5.30 वाजता जुन्नर येथील तिळवण तेली समाज कार्यालय या ठिकाणी होणार आहेत.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन, तसेच ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’, विविध विषयांवरील अध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवछत्रपती,संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. पण आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे असे विचार ठेवूनच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.