शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम
शेअर बाजारात आज नवीन विक्रम झाला आहे. सेन्सेक्सने 600 अंकांच्या उसळीसह 64,500 चा स्तर पार केला आहे. इंट्राडेमध्ये निर्देशांक 64,519 वर पोहोचला, जो नवीन उच्चांक आहे. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 160 अंकांची उसळी घेत 19,100 चा टप्पा पार केला आहे. निफ्टीने इंट्राडेमध्ये 19,138 चा उच्चांक गाठला होता. आज बाजारामध्ये ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे.