पुणे:पीएमपीएमएल कडून बस मार्गात बदल
दि.१जुलैपासून प्रवाशांच्या मागणीनुसार पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्र.३५अ – शिवाजीनगर/सिमला ऑफिस ते डांगे चौक या मार्गाचा विस्तार इंदिरा कॉलेज (ताथवडे) पर्यंत करण्यात आला आहे व बसमार्ग क्र.१६७ वाघोली ते हडपसर या मार्गाचा विस्तार भेकराईनगर डेपो पर्यंत करण्यात आला आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. २७७ -भोसरी ते कोथरूड डेपो या मार्गात बदल करून पिंपळेगुरव, साईचौक व सांगवी मार्गे तो करण्यात आला आहे.