February 26, 2024
PC News24
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे करसंकलन काम वेगात – नागरिकांना इशारा; कर थकविल्यास १ जुलैपासून थेट जप्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे करसंकलन काम वेगात – नागरिकांना इशारा; कर थकविल्यास १ जुलैपासून थेट जप्ती

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज, शुक्रवारपर्यंत (३० जून) करभरणा करणाऱ्यांसाठी विविध करसवलती देऊ केल्या आहेत. अंतिम मुदतीपर्यंत करभरणा न करणाऱ्यांच्या मालमत्ता एक जुलैपासून जप्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागा तर्फे ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ताधारकांना किमान दहा टक्के आणि कमाल २० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख ५२ हजार २९६ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३४ कोटी रुपये जमा झाले आहेत.शहरात ३१ मार्च २०२३ अखेर ~ ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची संख्या ३९,६५५ आहे. या मालमत्ताधारकांकडे साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत होता. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, जनजागृती, होर्डिंग आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सवलती देऊनही जे नागरिक कर भरत नाहीत, अशांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.

 

चार हजार जणांनी भरला कर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जनजागृती मुळे एक हजार ५९८ करदात्यांनी ११ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. दोन हजार ५२४ करदात्यांनी २७ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. ३९ हजार १३८ थकबाकीदारांपैकी चार हजार १२२ नागरिकांनी म्हणजेच जवळपास १० टक्के लोकांनी महापालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन करभरणा केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागातर्फे ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ताधारकांना किमान दहा टक्के आणि कमाल २० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख ५२ हजार २९६ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३३४ कोटी रुपये जमा झाले आहेत.येत्या एक जुलैपासून जप्तीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जप्तीसाठी जवानही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन ते तीन झोन मिळून एक जप्तीपथक तयार केले आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व जप्तीपात्र मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त,शेखर सिंह यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Related posts

पिंपरी चिंचवड:”१५ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव -सचिन साठे सोशल फाउंडेशनवतीने आयोजन

pcnews24

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

pcnews24

युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी पिंपरीच्या गौरव चौधरीची आणि गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड.

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना प्रशासकांकडून मंजुरी.

pcnews24

मोशी येथील कचरा डेपो व विविध प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून पाहणी.

pcnews24

टाटा कंपनीतील कामगारांचे संघटन विलक्षण – सुहास बहुलकर.’कलासागर दिवाळी अंक 2023′ प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न.

pcnews24

Leave a Comment