आरती गवारे, शेतकर्याची लेक एलआयसी’ परीक्षेत राज्यात मुलींमध्ये दुसरी.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी आरती गवारे या शेतकर्याच्या लेकीने ‘एलआयसी’ परीक्षेत घवघवीत यश मिळवून राज्यात मुलींमध्ये दुसरी आली आहे. आरती, खेड तालुक्यातील मोई येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत, आयुर्विमा महामंडळाच्या ‘विकास अधिकारी’ या पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तिला हे यश मिळाले आहे.
राज्यात, आयुर्विमा महामंडळाने ‘विकास अधिकारी2023’ या पदासाठी परीक्षा घेतली होती त्यात आरतीने राज्यात मुले व मुली यांच्यात नववा क्रमांक पटकवला आहे तर फक्त मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. आरतीचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आरती सध्या तळवडे येथील आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहे.