पुणे:मास इन्व्हेस्टमेंट्सतर्फे गुंतवणूकदारांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन
भारतीय शेअर बाजाराने नवी उच्चांक पातळी नुकतीच गाठली आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांच्या मार्गदर्शनासाठी मास इन्व्हेस्टमेंट्सने उद्या (रविवार, ताः २ जुलै) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
शेअर बाजाराची चाल यापुढे कशी असेल? बाजाराच्या या पातळीवर ‘प्रॉफिट बुकिंग’ करावे का ?, या प्रश्नांवर तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. ही कार्यशाळा सकाळी ८ ते १०.३० या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत व्हाईटओक कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष सोमय्या आणि शेअर बाजाराचे प्रसिद्ध तांत्रिक विश्लेषक किरण जाधव गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘व्हॉटस्ॲप बॉट’ या गुंतवणूकदारांसाठीच्या आकर्षक सुविधेचे अनावरण केले जाणार आहे. गुंतवणूकदारांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मास इन्व्हेस्टमेंट्सचे प्रमुख मकरंद विपट यांनी केले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.