September 26, 2023
PC News24
राज्य

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आर्थिक मदत जाहीर

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आर्थिक मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ झाला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति दुःख प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

Related posts

धानोरकर यांचे निधन… राजकीय प्रवास

pcnews24

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा, नक्की काय म्हणणे आहे ते समजून घेऊयात.

pcnews24

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

मुंबई शहरातील प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग.

pcnews24

महाराष्ट्र :”अजित पवार लोकं तुम्हाला जोड्याने मारतील ” – गोपीचंद पडळकर 

pcnews24

Leave a Comment