अंतराळातील विशाल उल्का पृथ्वीच्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ यांची भविष्यवाणी
लंडन आयच्या आकाराची विशाल उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने वर्तवली आहे. ‘नासा’ने २०१३ डब्लूव्ही ४४ असे या विशाल उल्केला नाव दिले आहे.ही विशाल उल्का सध्या ताशी ४३, ५१५ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावते असून पृथ्वीच्या २.२ दशलक्ष किलोमीटर इतक्या जवळपर्यंत येऊ शकते. हे अंतर खूप वाटू शकते मात्र अवकाश शास्त्राच्या दृष्टीकोनातून हे अंतर फारच कमी आहे. या उल्केचा परिघ अंदाजे १६० मीटर असल्याचा अंदाज आहे. हा आकार एखाद्या मोठ्या विमानाइतका आहे. पृथ्वीच्या जवळ असलेल्या अपोलो समुहातून ही उल्का आली असावी, असा अंदाज आहे.
ही उल्का येत्या १-२ दिवसातच पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आलेली असेल. सध्याच्या घडीला अंतराळात १,२९८, २१० उल्का अंतराळ संशोधकांना ज्ञात आहेत. त्या सगळ्याच काही पृथ्वीसाठी धोकादायक नाहीत.पैकी बहुतेक जेंव्हा गुरूसारख्या मोठ्या ग्रहाला धडकल्यामुळे किंवा पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेमध्ये आल्यानंतर वातावरणाच्या घर्षणामुळे अवकाशातच जळून जातात. त्यामुळे या अवकाशातील उल्कांच्या जवळपास काय आहे, त्यावर त्यांच्यापासून होणारा धोका अवलंबून असतो.