ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे ८० व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.
आशा नाडकर्णी यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. १९५७सालापासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी नवरंग, गुरु और चेला,चिराग, फरिश्ता, श्रीमानजी ,दिल और मोहब्बत, अलबेला मस्ताना, बेगुनाह अशा अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
मौसी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून आशा यांनी पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. त्यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या’वंदना’ या चित्रपटात त्यांना प्रथम संधी मिळाली होती.