शरद पवार सत्तेसाठी कुठेही जातात हा इतिहास*..प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची जोरदार टीका
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर- बावनकुळे यांनी २०१९ मधील फडणवीस – अजित पवार सरकारच्या संबंधात घडलेल्या घटनांबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले की पवारांची ही शेवटची ‘गुगली’ होती आणि आता त्यांना कोणतेही काम उरलेले नाही.
बावनकुळे यांनी खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, शरद पवारांनी त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बळीचा बकरा केले, जेव्हा त्यांनी ८० तासांत कोसळलेले सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेच्या शपथविधी समारंभात फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, परंतु त्यांचे सरकार फार काळ टिकले नाही.एका मुलाखतीत, फडणवीसांच्या विधानाला उत्तर देताना पवार पुण्यात म्हणाले की, ‘गुगली कुठे आणि केव्हा टाकायची हे मला माहिती आहे.
त्यावर बावनकुळे यांनी पवार सत्तेसाठी कुठेही जातात हा इतिहास आहे अशी जोरदार टीका केली. पवारांनी सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी करण्याचा खूप प्रयत्न केला आणि २०१९ मध्ये एक राजकीय षडयंत्र रचले. त्यांनी आपले पुतणे अजित पवार यांना त्या कटाचा एक भाग बनवून त्यांचीही राजकीय कारकीर्द उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण आता यापुढे पवारांची एकही गुगली चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस सरकार चालेल,असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.