महाराष्ट्र:समृध्दी महामार्गा वरील अपघाताने व्यथित होऊन अजित पवार यांचे आजचे कार्यक्रम रद्द
समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू व त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया,सर्व माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.