September 23, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

शाळेच्या बांधकामामुळे हॉस्पिटलच्या रुग्णांना उचलून नेण्याची वेळ,काळभोर नगर रस्त्याची दुरावस्था.

शाळेच्या बांधकामामुळे हॉस्पिटलच्या रुग्णांना उचलून नेण्याची वेळ,काळभोर नगर रस्त्याची दुरावस्था.

आकुर्डी काळभोरनगर येधील बालाजी चौकात आशा किरण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.शाळेचे बांधकाम सुरू असल्याने रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला त्यामुळे रुग्णालयाकडे वाहने जात नाहीत. परिणामी, रुग्णांना उचलून नेण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

“रस्ता खराब असल्याबाबत रुग्णांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संवाद चालू आहे. रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे” हॉस्पिटलमधील डॉ. रोहित शुक्ला यांनी सांगितले.

काळभोरनगरमध्ये आशा किरण हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात गरोदर महिला,तसेच विविध रुग्ण दाखल झाले आहेत. हॉस्पिटल लगत असलेल्या एका शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. या कामासाठी साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हॉस्पिटलकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहने हॉस्पिटलकडे जावू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. चालत जावे लागत आहे. वयोवृद्ध रुग्ण, गरोदर महिलांना उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत रुग्णांकडून हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार केली जात आहे.

Related posts

प्राधिकरण अनधिकृत बांधकामे, रेडझोन मधील मालमत्ता नोंदणी व हस्तांतरणचा मार्ग मोकळा

pcnews24

पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्म.

pcnews24

चिखलीतील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईनच्या नादात 13 लाखांची फसवणूक

pcnews24

अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण

pcnews24

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

pcnews24

‘शासन आपल्या दारी’ अभियान शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू रहाणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

pcnews24

Leave a Comment