September 28, 2023
PC News24
जिल्हा

पुणे शहर:कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईस सुरवात..सात जण निलंबित

पुणे शहर:कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईस सुरवात..सात जण निलंबित

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आदेश पुणे शहर पोलिस दलातून आणखी सात जणांना निलंबित करण्यात आले असून याबाबतचे आदेश शनिवारी (दि.1) काढले.

वारजे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगारा विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई केली नाही,असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईस सुरवात केली आहे. सराईत गुन्हेगार पपुल्या वाघमारे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल आहेत.तसेच वारजे भागात काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती . तरीही वारजे पोलिसांनी ‘मोका’ची कारवाई केली नाही.वारजे पोलिसांनी कायदेशीर बाबीचा कोणताही अभ्यास न करता तात्पुरत्या तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला. गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जनार्दन नारायण होळकर, पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांना निलंबित केले आहे.सदाशिव पेठेतील घटनेमधे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी आणि सहकार नगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांवर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्यानंतर आता वारजे पोलिस ठाण्यातील कारवाईमुळे पुणे शहर पोलिस दलातील या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Related posts

पुणे विभागातील ‘अमृत भारत’ योजनेत समावेश झालेल्या तीन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन.

pcnews24

अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.

pcnews24

असा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा!!

pcnews24

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

pcnews24

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

pcnews24

गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांना लोकसभा पोटनिवडणूक उमेदवारी?

pcnews24

Leave a Comment