महाराष्ट्र:समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात.
दोनच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरचा अपघाताच्या थराराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आज डिव्हायडरला धडकुन भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गा वरील हे अपघाताचे दुष्टचक्र काही संपेना! नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा ह्युडांई व्हेरना गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..
समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.