September 23, 2023
PC News24
अपघात

आनंद ठरला अखेरचा!…समृद्धी महामार्ग अपघातात पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू

आनंद ठरला अखेरचा!…समृद्धी महामार्ग अपघातात पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला.यात पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूचाही दुर्दैवी मृत्यू झाला.अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे राहात असलेल्या वनकर कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रणित वनकर देखील गेले होते. परंतु, ते गेल्या आठवड्यातच पुण्यात परत आले आणि आई, मुलगी आणि पत्नी ट्रॅव्हल्सने येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. लग्न समारंभाचा हा आनंद अखेरचा ठरला या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटविणे देखील कठीण झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची नोंद घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.

Related posts

प्लंबरचा बांधकाम साईटवरून पडून दुर्दैवी मृत्यू…सुरक्षेच्या उपायांची कमतरता

pcnews24

शिरूर:मद्यधुंद ट्रकचालकाची बाईकला धडक- बाप – लेकाचा जागीच मृत्यू.

pcnews24

मल्लपुरम – आतापर्यंत 21 मृतदेह सापडले!!

pcnews24

भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, नक्की काय घडला प्रकार.

pcnews24

ब्रिटिश प्रधानमंत्री ऋषि सुनक यांनी दिला जय श्रीरामचा नारा.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात ‘या ठिकाणी ‘ एक रस्ता अचानक खचला …आणि…

pcnews24

Leave a Comment