‘मतदान केल्याचे मतदारांनाच चुकीचे वाटत आहे’:रोहित पवार
जे काही काल झाले आणि गेल्या वर्षभरात जे काही या राज्यात घडत आहे ते बघितल्यावर मतदारांचे म्हणणे आहे की, आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. मतदारांनाच मतदान केल्याचे चुकीचे वाटत आहे. आमच्या सारख्या देखील नवीन आमदारांना वाटत आहे की, राजकारणात येऊन चूक केली का? लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा स्वतः ची खुर्ची कशी वाचवता येईल हाच प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार म्हणाले.