अजित पवारांची आज 10 वाजता बैठक !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी अजितदादा यांना समर्थन देणारे त्यांचे पदाधिकारी हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बैठकीनंतर चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.