गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या !
हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी गुरुची मनोभावे पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात. कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास यांना वेदांचे ज्ञान होते. त्यांनी महाभारत, पुराण कथा लिहिल्या आहेत. यंदा गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी साजरी होत आहे. या दिवशी तुम्हीही तुमच्या गुरूंना तसेच शिक्षकांना वंदन करून आशीर्वाद घेऊ शकता.