गुरुपौर्णिमेनिमित्त आज उपक्रमशील शिक्षकांचा गुरुगौरव चिंचवडला कार्यक्रम
चिंचवड : नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने आज गुरुपौर्णिमे निमित्त चिंचवड समरसता गुरुकुलम येथे सायंकाळी चार वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती असून यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील उपक्रमशील व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या, निवडक शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या जाधववाडी कन्या शाळेचे संदीप वाघमारे तसेच मुख्याध्यापिका माधुरी लवटे, योगिता सोनवणे, सरला पाटील, स्मिता जोशी, सुवर्णा वैद्य, सतिश अवचार, वनिता नेहे, सुरेखा कुंजीर यांचा समावेश आहे,
पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांचीही उपस्थिती आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी दिली.