पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादां सोबत- मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनीसुद्धा अजितदादांची मुंबई येथे भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
नगरसेवक नाना काटे यांनी आमचे नेते “नामदार मा.श्री.अजितदादा पवार” यांची महाराष्ट्र राज्याच्या “उपमुख्यमंत्री पदी” निवड झाल्याबद्दल दादांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.असे ट्विट केले आहे.यावेळी माजी शहराध्यक्ष श्री. संजोग वाघिरे पाटील, जेष्ठ नेते मा. नगरसेवक श्री. भाऊसाहेब भोईर, मा. उपमहापौर श्री. प्रभाकर वाघिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजितदादांनी शपथ घेतल्यावर बारामतीत तर फटके वाजवून जल्लोष करण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते अजित पवारांबरोबर असल्याचे दिसून आले आहे. अशातच पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनीसुद्धा अजितदादांची मुंबई येथे भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी काटे हे मताधिक्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिकीट देण्यात आले होते. नाना काटे अजित पवारांच्या जवळचे असल्याचीही पिंपरीत चर्चा आहे. कालच्या घडामोडीनंतर नाना काटे यांनी कार्यकर्त्यांसमेवत मुंबईला जाऊन अजित पवारांचे अभिनंदन केले आहे.