पुणे-नाशिक मार्गावर व्होल्वोच्या दहा बस धावणार
पुणे-नाशिक मार्गावर शिवाजीनगर येथून आरामदायी असलेल्या व्होल्वोच्या दहा बस धावणार आहेत. या बस जनशिवनेरी नावाने चालणार आहेत. पुणे- मुंबई (दादर) मार्गावर ई-शिवनेरी सुरू झाल्यामुळे त्या मार्गावरील शिवनेरी बस नाशिकसाठी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.
पुणे नाशिक मार्गावर प्रत्येक तासाला शिवाजीनगर येथून नाशिकसाठी जनशिवनेरीची बस असणार आहे. शिवाजीनगर येथून सकाळी सहा वाजता पहिली जनशिवनेरी असणार आहे. तर, रात्री उशीरा नऊ वाजता नाशिकसाठी जनशिवनेरी सुटणार आहे. जनशिवनेरी बस पूर्णपणे वातानुकूलीत असणार आहे. या बसला एका प्रवाशासाठी 500 रुपये तर अर्धे 255 रुपये एवढे तिकीट असणार आहे, अशी माहिती शिवाजीनगर एसटी आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.