चिंचवड: श्री साईनाथ बालक मंदिर शाळेत अशी साजरी झाली “गुरुपौर्णिमा”..
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचे पूजन, व्यास पूजन जसे महत्वाचे आहेच.पण आपला पहिला गुरु ही त्याची आई असते म्हणूनच श्री साईनाथ बालक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातृपूजनाचा कार्यक्रम साजरा झाला. बालक मंदिरातील लहानग्या बालकांनी आपल्या आईचे पूजन करून तिला वंदन केले.तसेच सर्व शिक्षक वृंदांचेही यानिमित्ताने मुलांनी पूजन केले.
या कार्यक्रमाचे विशेष औचित्य होते ते म्हणजे दत्तगुरूंच्या 24 गुरूंचे!श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या 24 गुरूंची माहिती मुलांनी खणखणीत आवाजात सांगितली.याप्रसंगी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी संस्थेच्या संस्थापिका माननीय निशाताई बेलसरे आवर्जून उपस्थित होत्या. कार्यकारी मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. स्वाती कुलकर्णी, शितल कुलकर्णी, मानसी कुंभार या शिक्षकांनी सहकार्य केले. प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.