September 28, 2023
PC News24
खेळ

महाराष्ट्र:पहिली राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न -50 किलो वरील वजनी गटात पिंपरी चिंचवडची खुशी रेवाले विजेती.

महाराष्ट्र:पहिली राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न -50 किलो वरील वजनी गटात पिंपरी चिंचवडची खुशी रेवाले विजेती

सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट येथे दि. 1आणि 2 जुलै रोजी झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय निवड चाचणी थाई किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत *नागपूर पनवेल, नाशिक, पिंपरी चिंचवड, रायगड, पुणे व यजमान सोलापूर जिल्ह्यांमधून स्पर्धक आले होते.या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने 51 सुवर्णपदकासह विजेतेपद पटकाविले
तर 27 सुवर्णपदकासह पिंपरी चिंचवडने उपविजेतेपद पटकाविले तर पुणे जिल्ह्याने वीस सुवर्णपदकासह तृतीय क्रमांक फटकावले *या स्पर्धेत झालेल्या प्रो टायटल बेल्ट स्पर्धेत


पुरुष गटात
50 किलो खालील (कमी) वजन गटात रायगडचा दीपक पवार विजेता ठरला. 60 किलो खालील वजनी गटात पिंपरी चिंचवड चा ऑस्टिन रॉड्रिग्ज विजेता ठरला तर 60किलो वरील वजनगटात पनवेलचा साहिल सिनारे विजेता ठरला तर महिला गटामध्ये 50 किलो खालील गटात पिंपरी चिंचवडची वैदही पवार विजेती ठरली तर 50 किलोवरील वजनी गटात पिंपरी चिंचवडची खुशी रेवाले ही विजेती ठरली
विजय झालेल्या या सर्व खेळाडूंची निवड गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे
स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूटचे वाडेकर व महाराष्ट्र थाई बॉक्सिंगचे कार्याध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हस्ते झाले. तसेच सचिव निलेश भोसले, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हिम्मत डेंगळे विकास बडदे,अतुल गोडसे,चिंतामणी मोकल, मोहिन बागवान परवेज शेख,प्रवीण वाघ सचिन लिमसे, अनुज भोसले,वरद केणी,सरद थळी, कार्तिक वाघ यावेळी उपस्थित होते सर्व विजेत्या खेळाडूंचे ऑल इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.हिम्मत डेंगळे यांनी सूत्रसंचालन केले

Related posts

गुजरात टायटन्सचा सुपर विजय!!

pcnews24

मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कार ब्रेझा.

pcnews24

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेवर मात करून भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

pcnews24

गहूंजे:देशभरातील क्रिकेट स्टेडियमसाठी पुण्याचा आदर्श ठरणार मार्गदर्शक.

pcnews24

‘आरोप सिद्ध झाले तर फाशी घेईन’ ब्रिजभूषण सिंग.

pcnews24

महाराष्ट्र:मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना मिळणार इतके विमा संरक्षण.

pcnews24

Leave a Comment