पिंपरी चिंचवड:महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव..नोंदणी बंधनकारक
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना मनपा कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला पालिके मार्फत परवानगी देण्यात येणार नाही.
मनपा कार्यक्षेत्रामध्ये मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपी पासुन मुर्ती बनविण्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले असून केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत कळविले आहे. त्यांनी केवळ पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणा-या मातीच्या मूर्तींची निर्मिती करावी असे सूचित करण्यात आले आहे.
महानगरपालिका पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. याआधी सन 2021-22 मध्ये देखील मनपा मार्फत गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक मूर्ती व पूजा साहित्यांचा अवलंब करण्याचे शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक 12 मे 2020 रोजीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली आहे.