चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे निर्माल्यापासून उदबत्तीची निर्मिती
चिंचवड देवस्थान ट्रस्टने निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्यास सुरवात केली आहे.थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजी संस्थेच्या सहकार्याने या अगरबत्तींच्या पुड्याचे मोरया गोसावी मंदिर परिसरात अनावरण झाले. मोरया, पवना व मंगलमूर्ती या तीन प्रकारात या उपलब्ध केल्या आहेत.महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातील निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्यात येणार आहेत.
देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, आनंद तांबे, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार या प्रसंगी उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण संरक्षण गतीविधीचे पुणे विभागप्रमुख रमेश करपे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पर्यावरण विषयक भूमिका मांडली. थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीचे संचालक श्रीराम कुंटे, विजय जायभाय, ओमप्रकाश तिवारी यांचा सत्कार करण्यात करण्यात आला.