गोवंश हत्येच्या निषेधार्थ चाकणमधे हिंदुत्ववादी संघटनांकडून कडकडीत बंद,बंदला शंभर टक्के प्रतिसाद
आषाढी एकादशीला कडूस (ता. खेड)येथे झालेल्या गोवंश हत्येमुळे संपूर्ण खेड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी खेड तालुक्याच्या विविध गावातून बंदची हाक देण्यात येत आहे.
सोमवारी (दि.3 ) चाकण शहर आणि लगतच्या मेदनकरवाडी सह विविध गावांत, सर्व व्यवहार बंद ठेऊन घटनेचा निषेध करण्यात आला. चाकण शहरात आणि परिसरात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.चाकण मधील हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी बंदची हाक दिली होती. या बंदला चाकण मधील सर्व व्यापारी व दुकानदार मंडळींनी सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा सुरू होत्या.
चाकण आणि लगतच्या गावातून बंद मोठ्या प्रमाणात पुकारण्यात आल्याने चाकण पोलिसांनी शहर व परिसरातील गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.