September 23, 2023
PC News24
गुन्हा

पिंपरी:अवघा एक ‘क्लू ‘ मिळाला आणि सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात.

पिंपरी:अवघा एक ‘क्लू ‘ मिळाला आणि सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी -चिखली येथे एका तरुणाचा झालेला खून म्हणजे एखाद्या चित्रपटात किंवा वेब सिरीज मधे घडावे असे हे थरार नाट्य होते.खुनाचे पद्धतशीर नियोजन,मारेकरी,आणि यावर पाळत ठेवणारा म्हणजेच वॉचर असा त्रिस्तरीय कट आखला गेला.याचा मुख्य मारेकरी खुनाच्या घटनेवेळी गोवा येथून सगळी सूत्रे हलवत होता. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांसोबत तो गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि शेवटी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता.

चिखली येथे 22 मे रोजी सोन्या उर्फ कृष्णा हरिभाऊ तापकीर (21) याचा दोघांनी गोळ्या झाडून खून केला. या खुनाचा मास्टरमाईंड करण रोकडे याने बुद्धीचा कस लावून संपूर्ण कट केला. त्यासाठी प्रॉपर प्लॅनर, प्रत्यक्ष मारेकरी, मारेकऱ्यांवर निगराणी ठेवणारे वॉचर, आणि खून केल्यानंतर मारेकऱ्यांना पळवून लावण्यासाठी वेगळी टीम असा भलामोठा कट रोकडे याने 1 ते 22 मे या कालावधीत आखला .

 

खुनाचा कट वाटू नये म्हणून करण रोकडे याने सौरभ पानसरे याला सोन्या तापकीर याच्यासोबत भांडण करायला लावले. त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून करण याने सौरभ याला पुढे करून सर्व कट केला. 22 मे रोजी दुपारी सोन्या तापकीर त्याच्या मित्रासोबत चिखली गाव कमानी समोर बोलत थांबला होता. त्यावेळी केटीएम दुचाकीवरून दोघेजण आले त्यातील मागे बसलेल्या एकाने सोन्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला. त्यानंतर ते दोघे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गुन्हे शाखा युनिट एकला सापडले.

खुनाची घटना घडण्यापूर्वी पासून करण रोकडे हा मारेकऱ्यांच्या संपर्कात होता. त्यावेळी तो गोवा येथे होता. त्याच्यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने त्याचा मोबाईल त्याच्या चिखली येथील घरी ठेवला. त्यामुळे काही काळ पोलीस गोंधळले. मात्र करण याचा दुसरा नंबर गोवा येथे असल्याचे समजताच गुंडा विरोधी पथकाने त्या मोबाईल नंबरचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, करण आणि त्याचे तीन साथीदार गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत होते.

याच दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला तांत्रिक विश्लेषणातून अवघा एक क्लू मिळाला आणि सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

आपल्या मागावर पिंपरी चिंचवड पोलीस असल्याचे समजताच करण याने त्याचा मोबाईल बंद केला. तो त्याच्या तीन साथीदारां सोबत मथुरेत पोहोचला. तिथे एका टुरिस्ट पंडितकडे मोबाईलची मदत मागितली. काही वेळेसाठी मोबाईल घेऊन त्याचे व्हाट्सअप करण याने त्याच्या मोबाईल मध्ये सुरु केले. त्यानंतर तो टुरिस्ट पंडितच्या व्हाट्सअप वरून त्याच्या साथीदारांना संपर्क करत असे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून पंडितला ताब्यात घेतले. पण त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. काही लोकांनी माझा मोबाईल घेतला. त्यानंतर त्यांनी एक खून केला सांगितल्याने मी माझा मोबाईल काढून घेतला असल्याचे पोलिसांना सांगितले.

मोबाईलच्या आयएमईआय नंबरचे तांत्रिक विश्लेषण गुंडा विरोधी पथकाने केले. त्यातील एक संपर्क त्याने चिखली येथील एका महिलेला केला होता. महिलेची माहिती आणि त्याआधारे आरोपीचा ठावठिकाणा काढून पोलिसांनी मथुरेपासून 750 किलोमीटर दूर असलेले मऊ जिल्ह्यातील मधुबन गाव गाठले.

इंस्टा फ्रेंडची घेतली मदत

मऊ जिल्ह्यातील मधुबन येथील एका तरुणाशी करण रोकडे याची इंस्टा ग्राम वरून ओळख झाली. तीन वर्षांपूर्वी त्या तरुणाने एका तरुणीला पिंपरी चिंचवड शहरात पळवून आणले. त्यावेळी करण रोकडे याने त्याला शहरात राहण्यासाठी मदत केली होती. या मदतीची तो परतफेड करेल असे त्याने आश्वासन दिले होते. दरम्यान, करण रोकडे आणि त्याचे साथीदार खून करून त्या तरुणाकडे गेले. आपल्याला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्याने त्याच्या घरात करण रोकडे आणि त्याच्या साथीदारांना आसरा दिला होता.

आरोपींना सापळा रचून पकडण्याचा थरार

मधुबन गावात जाऊन पोलिसांनी माहिती काढली. आरोपी एका घरात पहिल्या मजल्यावर लपून बसला होता.त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित घराच्या परिसरात सापळा लावला. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता चौघेजण एका खोलीत बसले होते. पोलिसांना पाहताच चौघांनीही पळ काढला.

तिघांनी पहिल्या मजल्यावरून थेट खाली उडी मारून शेतात धूम ठोकली.पोलिसांनी मुसळधार पावसात शेतातील चिखल तुडवत आरोपींचा पाठलाग करत तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान खोलीतील चौथा आरोपी पळून गेल्याचे सुरुवातीला समोर आले. मात्र तो कुठेही गेला नसून घरातच आहे अशी खात्री झाल्याने गुंडा विरोधी पथकाने घराची झडती घेत एकास ताब्यात घेतले. त्या आरोपीने पहिल्या मजल्यावरून शेजारच्या इमारतीवर उडी मारून पुन्हा घरात येऊन आपण आरोपींमध्ये सहभागी नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनावटपणा उघडकीस आला.

सगळे काही दहशतीसाठी

मयत सोन्या तापकीर याची चिखली परिसरात दहशत निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे करण रोकडे याची दहशत कमी झाली. परिसरात आपलेच वर्चस्व रहावे यासाठी करण रोकडे याने हा संपूर्ण कट रचून सोन्या तापकीर याचा खून केला. दरम्यान तो खून करून नेपाळ येथे पळून जाणार होता. अशाच पद्धतीने कट करून तो आणखी काही जणांच्या जीवाला धोका निर्माण करणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र त्याचा हा कट पोलिसांनी वेळीच उधळून लावला

Related posts

कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी.

pcnews24

पुण्यात घातपाताची शक्यता?एनआयए,आणि एटीएस सतर्क.

pcnews24

दिघी:साखरपुड्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार

pcnews24

कोयत्याच्या धाकाने नागरिकांना लुटणारी टोळी वाकड पोलिसांनी पकडली

pcnews24

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेल मध्ये तिरंग्याचा अपमान

pcnews24

पुणे:दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणारा बडोदावाला अटकेत.

pcnews24

Leave a Comment