पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ:महिलेने शरिरात कप्सूल स्वरूपात लपवून आणले तब्ब्ल 20 लाखांचे सोने
दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाने तिच्या शरिरात तब्ब्ल 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने लपवून आणले होते.कप्सूल स्वरूपात आणलेले हे सोने एक्स रे मशीनच्या तपासणीत हा सारा प्रकार उघडकीस आला. सीमा शुल्क विभागाने (कस्टम) शनिवारी (दि.1)जप्त केले आहे. महिलेने सोन्याची पेस्ट करून त्याच्या कॅप्सूल केल्या होत्या.
या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-52 या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.तिने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली,त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली,महिलेच्या गुप्तांगात 423 ग्रॅम 41 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या.या सोन्याची किंमत 20 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.कस्टम विभागा कडून पुढील तपास करण्यात येत आहे.