देश:मध्य रेल्वेने फुकट्यां कडून वसूल केला 94 कोटींचा दंड
रेल्वेच्या विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विनातिकीट प्रवास आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. एप्रिल ते जून कालावधीत अशी मोहिमांतून मध्य रेल्वेने 94.4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विशेष म्हणजे, रेल्वेने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ही दंडवसुली 41.42 टक्के जास्त आहे.जून महिन्यात विनातिकीट, अनियमित प्रवासाची आणि नोंदणी न केलेल्या सामानाची एकूण 13 लाख 39 हजार प्रकरणे आढळून आली. तिकीट तपासणीच्या 1 लाख 10 हजार प्रकरणांमधून 27 कोटी 70 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची तिकीट घेऊन आणि सामानाची नोंदणी करून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे.