September 23, 2023
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:शरद पवार की अजित पवार कोणासोबत जायचे? कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत

महाराष्ट्र:शरद पवार की अजित पवार कोणासोबत जायचे? कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून, शरद पवार की अजित पवार कोणाबरोबर जायचे अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी धनकवडी येथील कार्यालयात बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत. तर अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. तर आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला असून आम्ही शरद पवार यांचे की, अजित पवार यांचे या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले आहे.राज्यात देखील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहे. ते कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी 13 जिल्ह्यांपैकी पाच तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. पण आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचे याबाबत कोणत्याही प्रकाराचा निर्णय झाला नसून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, उद्या मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या दोन्ही पैकी कोणत्या बैठकीला जायचे असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. पण मी दोन्ही बैठकीला जाणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Related posts

महाराष्ट्र :अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी समोर मोठा पेच.. प्रदेशाध्यक्षपदावर दावा

pcnews24

छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’

Admin

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

X कडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड?

pcnews24

महाराष्ट्र:काँग्रेस आणि ठाकरे शरद पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार का?प्लॅन ‘बी’ ठरला?

pcnews24

सुप्रिया सुळेंसमोर बारामतीची खासदारकी वाचवण्याचे आव्हान, अजित पवार विरोधात गेल्याने टेन्शन हाय.

pcnews24

Leave a Comment