काळेवाडी:सेलिब्रिटींना फॉलो,लाईक करण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक
पिंपरी -जोतिबानगर,काळेवाडी येथे एका महिलेची फसवणूक करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला व तिची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 ते 22 एप्रिल या कालावधीत घडली.याप्रकरणी रवी विक्रम खुणे (वय 36, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला अदिती (पूर्ण नाव पत्ता,माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.