‘ ई डी चा धाक… शरद पवार बाप..’ नाशिकमध्ये NCP कार्यालयावरून अजित पवार गट व शरद पवार गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी
नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रचंड तणाव आहे. कार्यालया बाहेर शरद पवार यांचे समर्थक आणि अजितदादा समर्थक आमने सामने आले आहेत.
यावेळी शरद पवार समर्थक ‘ ई डी चा धाक… शरद पवार बाप..’ अश्या घोषणा देत आहेत, तर अजित पवार समर्थक ‘एकच वादा…. अजित दादा …’ अशा घोषणा देत आहेत.
यावेळी शरद पवार समर्थक गजानन शेलार आणि जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवार गटाने कार्यालयाचा ताबा सोडण्यास नकार दिला आहे. पोलीस दबावात असल्याचा आरोप शरद पवार समर्थक कार्याध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी केला आहे. एकूण सर्व परिस्थिती पाहता राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.