September 23, 2023
PC News24
महानगरपालिका

महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्यात ‘वर्ल्ड ऑफ वर्क’ सामंजस्य करार.

महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्यात ‘वर्ल्ड ऑफ वर्क’ सामंजस्य करार

अमेरिकास्थित अस्पेन इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे जागतिक पातळीवरील ग्लोबल ॲपोरच्युनिटी युथ नेटवर्क’ (जीओवायएन) अंतर्गत पिंपरी- चिंचवड शहरात ‘वर्ल्ड ऑफ वर्क’ या केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.याविषयीचा सामंजस्य करार पिंपरी – चिंचवड महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्यामध्ये झाला.

तरुणांना रोजगारक्षम कौशल्य आणि समुपदेशन प्रदान करण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ वर्क’ केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.आयुक्त शेखर सिंह म्हणाले,”लाइटहाऊस आणि वर्ल्ड ऑफ वर्क हे दोन्ही समांतरपणे शहरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कमी उत्पन्न असलेल्या समुदायातील प्रत्येक तरुणांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देणे ही खरोखरच समाधानकारक बाब ठरेल.

नोव्हेंबर 2019 पासून लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनतर्फे जीओवायएन – पुणे कार्यक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा विस्तार पिंपरी-चिंचवड शहरात केला जात आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये वर्ल्ड ऑफ वर्क केंद्रे उभारण्याबाबतचा सामंजस्य करार 30 जून रोजी पिंपरी येथे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.

हा उपक्रम प्रामुख्याने शहरातील झोपडपटटी भागातील रहिवासी, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील 18-35 वयोगटातील तरुणांना उपजीविकेच्या विविध संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने राबवला जातो.या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या समुदायातील कोणताही तरुण, नोकरी किंवा स्वयंरोजगारा बाबत प्रत्यक्ष केंद्रे, हेल्पलाइन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित माहिती मिळवू शकतील.

तरुणांना करिअरचे विविध पर्याय समजून घेणे, त्यांची क्षमता शोधणे, त्यांचे ध्येय निश्चित करणे आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे, लघु व्यवसाय सुरू करणे, व्यवसायाशी निगडित सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तरुणांना मार्गदर्शन केले जाईल. या केंद्रांमध्ये करिअर समुपदेशक कॉलवर उपलब्ध असतील.

 

हे समुपदेशक व्यावसायिक कौशल्य आणि नोकऱ्यांबाबत शहरातील तरुणांना माहिती देतील. यासाठी संस्था शहरातील कौशल्य संस्था, नियोक्ते, कर्मचारी भरती एजन्सी, सामुदायिक संस्था, सीएसआर फाउंडेशन, महाविद्यालये, एनजीओ, नगरसेवक, कॉर्पोरेट यांसह काम करणार आहेत.

लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन म्हणाले, ‘वर्ल्ड ऑफ वर्क कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिके सोबत सह-भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. वर्ल्ड ऑफ वर्क केंद्रे पिंपरी-चिंचवडमधील कमी-उत्पन्न समुदायातील, उपजीविकेच्‍या शोधात असलेल्‍या प्रत्‍येक तरुणांना रोजगारसोबतच चांगल्या जीवनशैलीचे योग्य आणि प्रभावी मार्ग उपलब्ध करतील.

Related posts

इंडियन स्वच्छता लीग 2.0 का क्षेत्रीय आरोग्य विभाग.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  मालमत्तेचे सर्वेक्षण आता ‘ड्रोन’द्वारे.

pcnews24

जनसंवाद सभेला येणारे ‘तेच ते नागरिक’ करतात चढ्या आवाजात तक्रारी.

pcnews24

मोशी येथील कचरा डेपो व विविध प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून पाहणी.

pcnews24

नागरिकांशी साधलेल्या करसंवादात ‘ऑन द स्पॉट’ निपटारा.. करदात्यांचा ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

pcnews24

शहरातील उद्याने होणार सिनेमा, वर्ल्ड पार्क थीम्सवर विकसित… नागरिकांकडून मागितले अभिप्राय.

pcnews24

Leave a Comment