September 28, 2023
PC News24
Other

पिंपरी:दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा-संदीप वाघेरे युवा मंचतर्फे आयोजन

पिंपरी:दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा-संदीप वाघेरे युवा मंचतर्फे आयोजन

पिंपरी येथील संदीप वाघेरे युवामंचच्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच इयत्ता जुनिअर के. जी. ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जेष्ठ विचारवंत लोकमत संपादक संजय आवटे व तसेच यशदा पुणेचे डॉ.बबन जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यामध्ये काव्या बाणेकर या विद्यार्थीनीस लॅपटॉप तसेच लुथ्रा ध्रुव व कांबळे आरजू यांना टॅब तसेच सान्वी गव्हाणे, सांची निकाळजे या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच इयत्ता बारावीच्या मुलवानी वंशिका या विद्यार्थीनीस लॅपटॉप तसेच यादव भूमिका व माळी तनिशा यांना टॅब पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.ज्युनिअर केजी ते इयत्ता आठवीच्या सुमारे 759 गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्यांचे (वह्या-कंपास) वाटप करण्यात आले.

युवामंचच्या वतीने वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नगसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. पिंपरी व पिंपरी परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी मी सदोदीत कसोशीने प्रयत्न करत असतो याच बरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून परिसरातील विविध क्षेत्रातील प्रोत्साहन देण्याचे काम वर्षभर सुरु असते.पिंपरी वाघेरे गाव ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे, तिच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची भावना वाघेरे यांनी व्यक्त केली.

मुलांच्या भविष्याविषयी पालकांची काही स्वप्न असतात. मात्र, आपल्या मुलांचा कल कोणत्या विभागाकडे आहे. याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. पालक आणि मुलांचं नातं हे मैत्रीपूर्ण असावे…मुलांचा कल ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले, मुलांविषयी पालकांची स्वप्न असणं गैर नाही.परंतु, आपले विचार त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते अधिक चांगल्या पद्धतीने आपले भविष्य घडवू शकतात. मुलांनीही तशी स्वप्ने पाहायला हवीत व स्वप्नांच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी.

विनाकारण धाक न दाखवता मुलांच्या मनात काय सुरू आहे. हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळू शकेल त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा, त्यांचे विचार जाणून घ्यायला हवेत.” असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

उज्वल भविष्यासाठीची पंचसूत्रीचा मुलांनी इयत्ता दहावी-बारावीच्या यशानंतर पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद कौशल्य, जागतिक भाषांचे आकलन करणे, तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेणे, आत्मविश्वास बाळगणे तसेच अपार मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवणे या पंचसूत्रीचा अवलंब करावा असे मत यशदा पुणेचे डॉ.बबन जोगदंड यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, सदस्य गणेश मंजाळ, सचिन वाघेरे, रंजना जाधव, पवन हिरवे, मयूर बोडगे, समीर वाघेरे, अपूर्वा खोचाडे, शितल पोतदार, दिपा काळे यांनी केले.कार्यक्रमास वस्ताद दत्तोबा नाणेकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, रामदास कुदळे, किसन कापसे, विजय जाचक, संदीप कापसे, शेखर अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

पोक्सो अंतर्गत रोड रोमियोवर गुन्हा दाखल

pcnews24

“भरत गोगावले यांनी माध्यमांवर बोलू नये,” संजय शिरसाट यांची गोगवलेंना विनंती.

pcnews24

पिंपरी चिंचवडमधे घरगुती गॅसचा काळाबाजार.

pcnews24

रविवारी रंगणार मेघ मल्हार संगीत महोत्सव,अभिनेत्री, नृत्यांगना उर्मिला कानिटकर यांचा अश्विनी पुरस्काराने होणार सन्मान.

pcnews24

महानगरपालिकेत होणार आशा स्वयंसेविका पदांची भरती.

pcnews24

अमेरिका :भारतातून ‘चोरीला गेलेल्या १०० मौल्यवान पुरातन वस्तू …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोनाल्ड रीगन सेंटरला भेट, नक्की काय संबंध…

pcnews24

Leave a Comment