September 23, 2023
PC News24
गुन्हा

पुणे गुन्हे अन्वेषण विभाग:पाकिस्ताननी गुप्तहेरांच्या संपर्कातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे गुन्हे अन्वेषण विभाग:पाकिस्ताननी गुप्तहेरांच्या संपर्कातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पोलिसांच्या जाळ्यात

 

पुणे शहरातील एका सॉफ्टवेअर अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्या नंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तब्बल २०१८ पासून त्याचा हा उद्योग सुरु होता. ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पुणे शहरातील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. ओटीपी विक्री आणि शेअरिंग घोटाळ्यात त्याचा सहभाग तसेच पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात तो होता. २०१८ पासून त्याचा हा प्रकार सुरु होता. सातारा जिल्ह्यातील असलेली ही व्यक्ती पुणे शहरातील नामांकीत आयटी कंपनीत कार्यरत होता.

अभिजीत संजय जांबुरे याला पुणे येथे अटक करण्यात आली. पुणे न्यायालयातून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला ओडिशामधील भुवनेश्वर येथे नेण्यात आले. जांबुरे याने गुजरातमधील आनंदा येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता.

अभिजीत दीर्घकाळापासून पाकिस्तानच्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. 2018 मध्ये तो फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानातील खानकी, फैसलाबाद येथील सय्यद दानिश अली नक्वी यांना भेटला. त्याने आपण चेग या अमेरिकन आयटी कंपनीत फ्रिलॉन्सर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. अभिजीतने त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड दानिशला दिला होता. दानिश अभिजीतच्या सल्लानुसार चेगमध्ये काम करत होता, पण कमाई भारतातील अभिजितच्या खात्यात जमा झाली होती. दानिशकडून मिळणाऱ्या या मदतीचा बदला अभिजीतला द्यावा लागला.

Related posts

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

pcnews24

घोडेगाव: चार नराधमांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार… घोडेगाव,आंबेगाव ता. जि.पुणे येथील घटना

pcnews24

चिखलीत गोळी घालून मित्राची हत्या

pcnews24

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

pcnews24

हडपसर:कर्जदार महिलेच्या घरी वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ करत दहशत.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

Leave a Comment