February 26, 2024
PC News24
अपघात

धुळे जिल्ह्यात भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दहा ठार तर १९ जण जखमी

धुळे जिल्ह्यात भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दहा ठार तर १९ जण जखमी

चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरने कार, पाच दुचाकी आणि दोन मालवाहू वाहनांना जोरदार धडक देत एका हॉटेलमध्ये शिरण्याबरोबच बस थांब्यावर जाऊन धडकला अश्या एकूण आठ वाहनांना धडक दिली. हा अपघात पळासनेर (ता. शिरपूर) गावात मुंबई-आग्रा महामार्गावर घडला.

या भीषण दुर्घटनेत ट्रकखाली चिरडून दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर धुळे जिल्हा आणि शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.मृतांमध्ये सात जण शिरपूर तालुक्यातील, एकजण देवपूर येथील, तर दोनजण राजस्थानातील आहेत. कंटेनरखाली चिरडले गेल्याने अपघातातील मृतांची ओळख पटविणे अवघड झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हा कंटेनर मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशातून धुळ्याकडे सिमेंटसाठी लागणारी खडी भरून जात होता.पुलावरून वेगाने आल्याने चालकाचे कंटेनर (आरजे ०९ जीबी ९००१) वरील नियंत्रण सुटले. कंटेनरने सर्वप्रथम एका कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर पुढे चालणाऱ्या पिकअप, स्कूल बस आणि चार ते पाच दुचाकींना धडक देत कंटेनर महामार्गालगत असलेल्या हॉटेल सद्गुरूमध्ये शिरला.हॉटेल शेजारील बसथांब्याला धडकून कंटेनर उलटला. यावेळी चहा-नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलेले नागरिक, तसेच धुळ्याकडे निवासी आश्रमशाळेत जाण्यासाठी निघालेले विद्यार्थी आणि पालक कंटेनरखाली चिरडले गेले.अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना प्रकट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अपघातातील मृतांची नावे कन्हैयालाल बंजारा (कंटेनरचालक), सुरपालसिंग दिवानसिंग राजपूत (सहचालक, दोघेही रा. जावदा, जि. चितोडगड, राजस्थान), प्रतापसिंग भिमसिंग गिरासे (७०, पळासनेर, ता. शिरपूर), दशरथ कमल पावरा (२२, पळासनेर, ता. शिरपूर), गीता मुरी पावरा (१५), मुरी सुरसिंग पावरा (२८), संजय जायमय पावरा (३८), रितेश संजय पावरा (१०, सर्व रा. कोळसापाणी, ता. शिरपूर), खिरमा डेबरा कनोजे (१०, आंबापाणी, ता. शिरपूर), सुनीता राजेश खंडेलवाल (देवपूर, धुळे).

Related posts

अपघाताचा ‘root cause’ समजला आहे – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

pcnews24

कोकणात ट्रेकिंगसाठी गेलेल्या कारचा अपघात दाट धुक्याने तिघांचा मृत्यू तर एक बचावला

pcnews24

36 तासानंतर महिला ढिगाऱ्याखाली जिवंत.

pcnews24

नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ भीषण अपघात -ट्रकची कंटेनरला जोरदार धडक, आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू

pcnews24

पुणे जिल्ह्यात अपघाताचा सर्वाधिक धोका असलेले ६३ ‘ब्लॅक स्पॉट’ प्रशासनाने केले निश्चित.

pcnews24

अरे बापरे!!पाकिस्तानात दहशतवादी लढवणार निवडणूक.

pcnews24

Leave a Comment