September 23, 2023
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:राज्यात जे घडतंय तो मतदारांचा अपमान : राज ठाकरे

महाराष्ट्र:राज्यात जे घडतंय तो मतदारांचा अपमान : राज ठाकरे

 

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य केले आहे.जे घडतंय तो मतदारांचा अपमान आहे असं ते म्हणाले.महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला प्रकार अत्यंत किसळवाणा आहे. या किळसवाण्या प्रकाराची सुरुवात शरद पवार यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग करून केली होती, आता शेवटही त्यांच्याकडेच जात आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या प्रकाराबाबत मी लवकरच मेळाव्यात सविस्तर भूमिका मांडणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राज्यातील झालेला प्रकार किळसवाणा असून, हा मतदारांचा अपमान आहे. एका दिवसात हा प्रकार घडलेला नाही. त्याचे व्यवस्थित नियोजन आधीच सुरू असणार. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. या प्रकाराबाबत राज्यातील प्रत्येक घरात घरात फक्त शिव्या ऐकू येतील.’

‘सध्या कोणता नेता, कोणत्या पक्षात आहे हे काहीच सांगता येत नाही. कॅरमचा डाव इतका विचित्र फुटला आहे की, कोणत्या सोंगट्या कोणत्या बाजूला गेल्या आहेत हेच सांगता येत नाही,’ अशी टीका ठाकरे यांनी केली. तसेच, ‘घड्याळाने काटा काढला, की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही,’ असे ठाकरे म्हणाले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील ही अजित पवारांसोबत जाणारी माणसे नाहीत. मात्र, तरीही ते तिकडे आहेत, हे सर्व अनाकलनीय आहे. या गोष्टी बहुधा पवारांनीच पेरल्या असाव्यात. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसल्या तरी आश्‍चर्य वाटणार नाही, असे राज ठाकरे या वेळी नमूद केले.

यानंतर सोशल मीडियामध्ये राज यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल चर्चा चालू आहे. २०१४ रोजी राज यांनी मोदींची प्रशंसा केली होती नंतर त्यांनी ‘ लाव रे तो व्हिडिओ ‘ म्हणत शरद पवारांना साथ दिली, त्यानंतर परत त्यांचा कल भाजपा कडे आहे असे वाटत होते आणि आता त्यांना भुमिकाच नाही असं बोललं जात आहे.

Related posts

भाग २ चिंचवड विधानसभा मतदारसंघ : आमदार अश्‍विनी जगताप.

pcnews24

जाहिरातीच्या वादानंतर फडणवीस म्हणाले…

pcnews24

महाराष्ट्र:अजित पवार यांचे अत्यंत प्रभावी, आक्रमक आणि भावनिक आवाहन.

pcnews24

‘अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’ बारामतीचा आवाज!!

pcnews24

छत्रपती संभाजीनगर रात्री ११ नंतर बंद!!

pcnews24

अजित पवार यांचा काल पुण्यामध्ये रोड शो;पार्थ पवार पुन्हा सक्रिय

pcnews24

Leave a Comment