February 26, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

महाराष्ट्र:राज्यातील मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

महाराष्ट्र:राज्यातील मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

राज्यातील मराठा, कुणबी,कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.क्यू-एस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.

अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी 50 पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि 25 डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल. या योजनेसाठी 5 वर्षाकरिता 275 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली.ही योजना 2023-24 पासून राबविण्यात येईल. सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील.

Related posts

दहावीचा निकाल पाहण्यासाठी हे करा दहावी परीक्षेचा निकाल आज (2 जून) जाहीर होणार आहे.

pcnews24

मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ’ मध्ये युवा कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन

pcnews24

आता पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा महत्वाची,बघा नक्की काय विषय.

pcnews24

पिंपरी चिंचवड मधील महाविद्यालयात घडला हा प्रकार.

pcnews24

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर,कोकण विभागाने मारली बाजी निकाल 98.11 टक्के

pcnews24

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची मागणी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

pcnews24

Leave a Comment