पिंपरी चिंचवड, मावळसह तळेगाव येथे अजित पवारांना साथ,तर शरद पवारांनची अवस्था संभ्रमित आणि पुणे?
पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने सर्वात जास्त परिणाम हा पुण्यावर झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातही अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी स्थिती होऊन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जशी ठाकरे घराण्याची बरीच वर्षे मुंबईवर एकहाती सत्ता होती तसेच वर्चस्व राष्ट्रवादीचे पुण्यावर आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने सर्वात जास्त परिणाम हा पुण्यावर झाला आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत देखील जबरदस्त तणाव असून उभी फुट पडल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील जनता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी फार पूर्वीपासून जोडले गेले आहे, तर पिंपरी चिंचवड मधील आमदारांसाह शहर प्रमुखांनी शहराच्या विकासासाठी अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले. तर, मावळ, तळेगाव सह आमदार अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड, मावळ आणि तळेगावची, अजित पवार बाजूने असल्याचे भूमिका स्पष्ट असताना मात्र पुण्यात अंतर्गत भूमिका अजूनही विभागल्या आहेत. त्यामुळे आता पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद दिसून येत आहे.
काल झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या बाजूने पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच दीपाली धुमाळ, काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.राजकीय परिस्थिती जसजशी स्पष्ट होत चालली आहे, तसतसे या अंतर्गत गटबाजीचा पक्षाच्या पुण्यातील राजकारणात कसा परिणाम होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.