रेशन कार्डला आधार कार्ड जोडण्याच्या तारखेत वाढ
नुकतेच सर्वांनी आधार कार्ड हे पॅन कार्ड लिंक केले आहे. त्याच प्रमाणे आता सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार, रेशन कार्ड आणि आधार कार्ड करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याची अंतिम तारीख 30 जून 2023 रोजी होती. यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त रेशन घेण्यापासून रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.