मावळ:मूलींच्या स्वच्छतागृहात लावले CCTV, प्रसिद्ध शाळेत घडली घटना..
पुण्यामधील मावळ तालुक्यातील अंबी गावात असलेल्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. या स्कूलमधील मुलींच्या स्वच्छतागृहात शालेय प्रशासनाने CCTV कॅमेरे लावले होते. याबाबतची तक्रार ही मुलींनी पालकांना केली. त्यानंतर काही संघटनांनी या शाळेच्या प्राचार्यांना जाब विचारला. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्यांना मारहाण केली. प्राचार्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.