September 23, 2023
PC News24
गुन्हा

आदिवासी तरुणाच्या ‘त्या ‘ व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी घेतली गंभीर दखल

आदिवासी तरुणाच्या ‘त्या ‘ व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी घेतली गंभीर दखल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या जवळ उभा असलेला व्यक्ती त्याच्यावर लघुशंका करत आहे. जमिनीवर बसलेला व्यक्ती अतिशय घाबरलेला दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर दहशत स्पष्ट दिसत आहे. अतिशय संतापजनक अशा या व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि वेगानं चक्रं फिरवली व आरोपीला अटक केली.

भोपाळ,मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एकानं आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे.आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

आरोपी प्रवेश शुक्लाला अटक करण्यात आल्याची माहिती सिधी जिल्ह्याच्या एएसपी अंजू लता पटेल यांनी दिली. ‘या प्रकरणात लवकरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आरोपी शुक्ला विरोधात बहारी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २९४, ५०४ आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियमाच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,’ असं पटेल यांनी सांगितलं.

Related posts

घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक,सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवडमधील.

pcnews24

निघोजे महाळुंगे रोडवर कंटेनर चालकाला मारहाण दोघांना अटक.

pcnews24

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

pcnews24

सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल,महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्था प्रकल्पातील घटना.

pcnews24

किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा हात

pcnews24

चिंचवड:सरकारी कामाच्या टेंडर बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

pcnews24

Leave a Comment