चित्रपटनगरी :’शुटींग आधी मासिक पाळीच्या डेटबाबत विचारले’
अभिनेत्री अमृता सुभाषने सेक्रेड गेम्स 2 या वेब सिरीजची शुटींग सुरु असताना दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत आलेल्या अनुभवाबाबत एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘इंटिमेट सीन चित्रित करायचा होता, त्याआधी अनुरागने मला मासिक पाळीच्या डेटबाबत विचारले, त्यानुसार त्याला या शुटींगची वेळ निश्चित करायची होती, अनुराग संवेदनशील आहे, तो कलाकारांची काळजी घेतो,’ असे अमृताने सांगितले. या सिरीजमध्ये अमृता रॉ एजेंट होती.