पुणे शहर एनसीपीच्या (अजित पवार गट)अध्यक्षपदी दीपक मानकर यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेवून शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे त्यानंतर पुण्यामध्ये नेते व कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकाना आपण कोणत्या नेत्यासोबत जायचे हा प्रश्न पडला आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नियुक्ती केली आहे.
शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर दिपक मानकर म्हणाले की, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून अजित पवार यांनी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे मी आनंदी असून यापुढील काळात शहरातील सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.तसेच, संघटनेत पुणे शहरामधील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्याच बरोबर राज्य सरकार मार्फत, समाजातील सर्व घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ देणार