विजयकुमार खोराटे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याअतिरिक्त आयुक्त पदी, जितेंद्र वाघ यांची बदली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाली असून विजयकुमार खोराटे यांची त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
जितेंद्र वाघ यांची 21 सप्टेंबर 2021 रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. वाघ यांनी पावणे दोन वर्षांच्या कारकीर्दीत चांगले काम केले. शांत, संयमी, मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख होती. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वाघ यांची महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.