भाजपच्या बड्या नेत्यासह 4 माजी नगरसेवकांचे राजीनामे
सोलापूरमधील भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. हे चारही नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपाचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले, राजश्री चव्हाण व जुगनबाई आंबेवाले यांनी राजीनामे दिले आहेत.