महाराष्ट्र: ‘निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश ऐतिहासिक’
राज्यातील विकासाला वेग आला आहे. आम्ही कोणतेही प्रस्ताव हे केंद्र सरकारकडे पाठवले की केंद्र ते मंजूर करत आहे. मोदी साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश हा ऐतिहासिक आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही अजून जोमाने महिलांसाठी काम करा. आम्ही आपल्या पाठिशी आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.