महाराष्ट्र:मुलाच्या गे रिलेशनशीप विषयी महेश मांजरेकरांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सध्या व्यग्र आहेत. त्यांनी निर्मिती केलेली ‘एका काळेची मणी’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. जिओ स्टुडिओज कडून मराठी डिजिटल विश्वात ‘एका काळेचे मणी’ ही एक धमाल वेब सीरिज आणली आहे.‘एका काळेचे मणी’ या सीरिजबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले की, कुटुंबासोबत पाहता येईल अशी मेजशीर अशी वेब सीरिज आहे. काळे कुटुंबाची ही गोष्ट आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या लोकांमुळं काय काय घडतं, त्याचे किस्से ही सीरिज आहे. आम्ही नुसताच धागडधिंगा दाखणव्याचा प्रयत्न नाही केलाय.
एका चित्र-विचित्र फॅमिलीची ही आगळी वेगळी कहाणी आहे. या वेब सीरिजच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत मांजरेकरांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. या सीरिजमधील समलैंगिक संबंध आणि त्याचा विषय यावर भाष्य केलंय.
सीरिजमध्ये समलैंगिक संबंधांवरही भाष्य करण्यात आलंय. मराठी प्रेक्षक हे पाहण्यास तयार आहे का? असा प्रश्न महेश मांजरेकरांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आपणच आपल्या प्रेक्षकांना कमी लेखत असतो. आपला प्रेक्षक हे सगळं समजण्यासाठी खूप हुशार, स्मार्ट, पुरोगामी असा आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आपले प्रेक्षक यासाठी तयार नाहीत, असं म्हटलं तर ते मुर्खपणाचं ठरेल, असं मांजरेकर म्हणाले.यावेळी ते मराठी प्रेक्षक नवीन विषय पाहण्यास तयार नाहीत, असं म्हटलं जातं ते साफ चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितले.
मांजरेकर पुढं म्हणाले की, असा एक काळही होता, जेव्हा समाज अशा लोकांना , त्यांची नाती स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळं आत्यहत्येच्या घटना घडत होत्या. पण आज हे चित्र बदललंय. त्यांना आपण स्वीकारतोय. माझ्या मुलानं येऊन मला सांगितलं की गे रिलेशनशीपमध्ये आहे, तर मी त्याचा सहज स्वीकार करेन, कारण ती त्याची निवड आणि त्याचं आयुष्य आहे. त्याला हवं तसं आयुष्य जगू देईल. माझ्या मुलीनं जरी हे मला सांगितलं तरी, मी ते स्वीकारेन.
प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखं मोठं व्हावं आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. पण या नव्या मालिकेत हेच वेगळ्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. आजची पिढी वेगळी आहे. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, आणि त्यामुळंच आपल्या दैनंदिन आयुष्यात एका विरोधाभास आणि धमाल निर्माण होते.